१८ महिने उलटूनही कारवाई शून्य..
ठाणे-प्रतिनिधी अरविंद कोठारी
दिवा- ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळेंचा मुद्दा सर्वत्र चर्चेत असतानाच दिवा शहरातील विकास म्हात्रे गेट मध्ये असलेली ड्यू ड्रॉप स्कूल ही शाळा श्री जयवंत एज्युकेशन अँड मेडिकल ट्रस्ट यांनी कांदळवन नष्ट करून तब्बल ३४४ ब्रास भराव करून तळ+४ मजली अनधिकृत ईमारत उभारली असल्याने संबंधितांवर ३६,७१,१६८ ईतकी रक्कम दंड स्वरूपात ठोठावण्यात आली आहे. तर विहित मुदतीत ही रक्कम अदा न केल्याने सदरच्या ७/१२ वर ह्या रकमेचा बोजा चढवण्यात आला असल्याचे तत्कालीन तहसीलदार यांनी स्पष्ट म्हटले आहे. तसेच दिवा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी नोव्हेंबर २०२३ रोजी १५ दिवसात सदरचे बांधकामं हटवणे संदर्भात अंतिम नोटीस बजावूनही अद्याप ह्या शाळेवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर अनधिकृत शाळेच्या बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई न करता निव्वळ कागदी घोडे नाचवून महापालिका अधिकाऱ्यांनी केवळ अनधिकृत बांधकामाला संरक्षित केले नसून त्या शाळेत शिकणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं धाडस केल आहे.
सदरचे बांधकामं हे लोडबेरिंग स्वरूपाचे असून लोखंडी चॅनेलवर तळ+४ मजली ईमारत उभारण्यात आली आहे. ह्या धोकादायक ईमारतीत ड्यू ड्रॉप स्कूल ला शिक्षण विभागाकडून कशी काय मान्यता देण्यात आली असा सवाल ही याचिकाकर्ते तथा जनसेवा व पर्यावरण संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Post a Comment
0 Comments