Type Here to Get Search Results !

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाद्वारे ऊस वाढीबाबत मार्गदर्शन




राहुल चव्हाण @बारामती रिपोर्टर 

बारामती:- आज दि.२६ रोजी झारगडवाडी गावात कृषी विकास प्रतिष्ठानचे सीईओ डॉक्टर निलेश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषी कन्या व प्राध्यापक कदम सर यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वृद्धीचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती देऊन त्यांच्या उत्पादनात वाढ करणे हे असून, त्यासाठी AI आधारित पद्धतींचा उपयोग करण्यात येत आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे ऊस लागवडीत सिंचन, खत व्यवस्थापन, कीटक नियंत्रण आणि जमिनीची गुणवत्ता यांचा अचूक अभ्यास करून उत्पादन अधिकाधिक वाढविण्याचे कोणकोणते मार्ग आहेत.तसेच या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना AI च्या मदतीने जमिनीतील आर्द्रता, तापमान, आणि पोषण घटकाबद्दल माहिती दिल्यामुळे शेतकरी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतात. यामुळे केवळ उत्पादन वाढत नसून, खर्चही कमी होतो तसेच पर्यावरणीय परिणामही नियंत्रित राहतात.

प्राध्यापक कदम सर याबाबत म्हटले की, “AI आधारित तंत्रज्ञानामुळे ऊस शेतकरी आता परंपरागत पद्धतींपेक्षा अधिक शास्त्रोक्त निर्णय घेण्यास सक्षम झाले आहेत. ही पध्दती ग्रामीण कृषी विकासासाठी एक मोठा टप्पा आहे.”असे कदम सर यांनी सांगितले.

तसेच कृषी कन्या यांनी सदरचा उपक्रमाचा परिणाम ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यात होत असून भविष्यातील कृषी क्षेत्रात AI चा अधिकाधिक विस्तार होईल, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना AI च्या वापराबाबत प्रशिक्षण देणे, प्रत्यक्ष शेतात तंत्रज्ञानाचे प्रयोग करणे व त्याचे फायदे समजावून सांगणे हा उपक्रम महत्वाचा ठरत आहे. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे कारण AI चा वापर करून उत्पादन लागतामध्ये बचत आणि परिणामकारकता वाढविणे शक्य आहे असे मत व्यक्त केले.यावेळी कृषी कन्या गायत्री शर्मा,साक्षी उकिरडे, विजयालक्ष्मी रूद्रमठ,अलसना सय्यद, नम्रता पाटील, गौरी गाढवे, समृध्दी घाडगे तसेच गावचे सरपंच अजित बोरकर, छ.स.सा.कारखान्याचे संचालक संतोष मासाळ,मा.सरपंच पद्मनाभ निकम, हनुमंत झारगड, अविनाश जाधव,फौजी.सतिश कुलाळ, रमेश झारगड, आप्पासाहेब साळूंके, बाळासाहेब कोळेकर, चौधरी काका,आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments