प्रतिनिधी, - अविनाश व्हरकाटे
धाराशिव तालुक्यातील सुंभा येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिर हजारो भाविक भक्ताने गजबजले दि. 06/07/2025 रोजी आषाढी एकादशी निमित्ताने गावामध्ये मोठ्या उत्साहाचे रूप दिसून आले तसेच मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी स्वरूप धारण झाले होते, गावातील व आसपासच्या गावातील वारकरी बांधवांनी ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात विविध कला संपन्न केल्या व विठू नामाचा गजर मोठ्या उल्हासाने भक्तिभावाने संपूर्ण गावामध्ये पालखी मिरवणूक कार्यक्रम संपन्न झाला
संपूर्ण गावामध्ये एकादशी निमित्त आनंदाचे वातावरण व यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते संपूर्ण गावामध्ये लहान थोरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भक्तिभावाचे समाधान दिसत होते

Post a Comment
0 Comments