प्रतिनिधी: विनोद चव्हाण
आज मांडवी मध्ये शेतकरी व दिव्यांग बांधवांनी आपली मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलेगेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर कोसळला आहे — कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी बाजारातील भावपतन. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चालले आहेत.दसरीकडे, दिव्यांग व्यक्तींना मिळणारे मासिक मानधन केवळ नावालाच आहे — त्यात जीवनावश्यक गरजाही भागत नाहीत. प्रमुख मागण्या
1. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तात्काळ लागू करावी.
2. दिव्यांगांना मासिक ₹6000 मानधन द्यावे.
3. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी.सकाळी 10 वाजताच आंदोलकांनी गावातील मुख्य रस्ता अडवून घोषणाबाजी सुरू केली. “कर्जमाफी आमचा हक्क आहे”, “दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे”, “सरकार झोपेतून जागे व्हा” अशा घोषणा देत रस्ता दणाणून टाकला.अनेक वृद्ध दिव्यांग व्यक्ती व्हीलचेअरवर उपस्थित होत्या. शेतकरी महिलाही हातात झेंडे घेऊन "आमचं दुःख ऐका" असा आक्रोश करत होत्या. संपूर्ण वातावरणात असंतोष, वेदना आणि निर्धार यांचा संगम दिसून येत होता.हे आंदोलन केवळ रस्त्यावरचे नव्हते, तर हक्कासाठीचा हंबरडा होता.
या पार्श्वभूमीवर मधुकर शेंडे तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, किनवट. यांच्या नेतृत्वात, भगवान मारपवार तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना, सतीशभाऊ बोनतावर, विधानसभा अध्यक्ष मा. त्रिभुवन सिंहजी ठाकूर शेतकरी नेते,यांच्या प्रमुख उपस्थितीत.परशुराम गाठे,
डी. आर. राठोड, निरंजन राठोड, विनोद चव्हाण,गजानन चव्हाण, अंकुश राठोड, दिपक ठाकूर, माधव पंधरे, परशुरामजी गाठे, माधव बोरकर,गोवर्धनराठोड, विठ्ठल राठोड,रवी रेनके, आशिष बोरकर, विलास मादावर, दत्ता मादावर अविनाश पंधरे, सुभाषजी काळे, बालू सिसले, माधव बोरकर, विशाल काजळे, सुंदर गुरनुले, भारत सोनुले,दशरथ चव्हाण, राजू चव्हाण, शेषराव जाधव, बाली ताई जंगलेवाड, दासू प्रधान, रणवीर सुरकुंटवार, घोंगडू आदे,इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, चक्कजाम मधे सहभागी होऊन चक्कजाम शांततेत पार पडला. सहायक पोलीस निरीक्षक मा. गायकवाड, मा. कनाके साहेब, मा.गुहाडे यांनी चोख बंदोबस्त ठेऊन आंदोलक यांना सहकार्य केले.
शेतकरी आणि दिव्यांग बांधवांची ही लढाई ही केवळ मदतीसाठी नाही, तर स्वाभिमानासाठी होती. आता सगळ्यांच्या नजरा शासनाच्या उत्तराकडे लागल्या आहेत.

Post a Comment
0 Comments