राहुल चव्हाण @प्रतिनिधी
बारामती : हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. हिंदू धर्मात गुरूला विशेष स्थान असून, गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. गुरु आणि शिष्य यांचे पवित्र नाते दृढ करण्याचा हा दिवस आहे. गुरू म्हणजे फक्त शिक्षक नव्हे, तर जीवनात अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्गदर्शक असतो.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी जिल्हा परिषद शाळा झारगडवाडी येथील विद्यार्थ्यांनी आपले गुरुवर्य यांना पुष्पगुच्छ देऊन गुरुपौर्णिमा साजरी केली.यावेळी मुख्याध्यापक जाधव सर व लडकत सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात गुरुचे महत्व काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी नाळे मॅडम, लडकत मॅडम, भोसले मॅडम, वाडते मॅडम तसेच विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.
.jpg)
Post a Comment
0 Comments