गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी
डोणगाव :- डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम अंजनी बु येथे ओमणी अम्बुलन्स व मोटारसायकल यांच्या मध्ये अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना दि. ३१ जुलै ला रात्री घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हकिकत अशा प्रकारे आहे की, यातील फिर्यादी अनिल शेषराव शिंदे चा भाउ संजय शेषराव शिंदे हा स्प्लेंडर मोटार सायकल क्रमांक MH 28 AH 5489 ने शेतातुन घरी अंजनी बु कडे जात असतांना गजानन मारोडकर यांचे शेताजवळ ८वाजताच्या मेहकर कडून येणारी ओमणी चालक यांनी त्याचे ताब्यातील मारोती ओमणी अम्बुलन्स क्रमांक MH 06 J 6300 या रुग्णवाहीका भरघाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन संजय शिंदे यांचे मरणास कारणीभुत झाला व समोरासमोर धडक मोटारसायकल चे नुकसान करुन स्वताचे गाडीचे नुकसान करण्यास व स्वताचे दुखापतीस कारणीभुत ठरला त्यांचेवर कारवाइ करावी. अशा फिर्यादी अनिल शेषराव शिंदे यांच्या तोडी रिपोर्टवरुन ठाणेदार अमरनाथ नागरे याचे आदेशाने गुन्हा दाखल करून ओमणी चालकाविरुद्ध कलम 106(1),281,324(4), 125(A) BNS दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोहेका संजय धिके याच्याकडे देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments