Type Here to Get Search Results !

मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त "कॅमेरा पूजन 2025" हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला



रावेर तालुका प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे

छायाचित्रण क्षेत्रातील जुने कॅमेरे व आजच्या आधुनिक डिजिटल तसेच एआय युगातील छायाचित्रण कार्यपद्धती यांचा विद्यार्थ्यांना सखोल परिचय व्हावा या हेतूने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. तुषार मानकर सुप्रसिद्ध छायाचित्रकारआणि संचालक ,रावेर शिक्षण प्रसारक मंडळ. तसेच मा.श्री राजेंद्र जावळे सर, मार्गदर्शक छायाचित्रकार, मा.श्री. जगदीश राजपूत सर, शाळेच्या शैक्षणिक संचालिका सौ. वनिता पाटील मॅडम आणि शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. जनार्दन धनगर सर यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित व्हावे यादृष्टीने शाळेचे सचिव मा.श्री. स्वप्निल पाटील सर यांनी ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली. तसेच या कार्यक्रमास शाळेचे व्यवस्थापक मा. श्री.किरण दुबे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता करण्यात आले. भारतीय परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते दुर्मिळ कॅमेऱ्यांचेही पूजन यावेळी करण्यात आले.या वेळी आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन (भुसावळ) यांच्या माध्यमातून जुन्या व नव्या कॅमेऱ्यांचे महत्त्व प्रोजेक्टरच्या सहाय्याने समजावून सांगण्यात आले. तसेच क्रिएटिव्ह व ॲब्स्ट्रॅक्ट फोटोग्राफीचे स्लाईड शो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.

यावेळी श्री राजेंद्र जावळे सर यांनी फोटोग्राफीच्या प्रवासावर आधारित एक सुंदर गान सादर केले ."असे कसे झाले हो... जुने सारे गेले अन् नवीन नवीन आले…".या गानामुळे छायाचित्रणातील झालेल्या प्रगतीची कल्पना विद्यार्थ्यांना प्रभावीपणे मिळाली.या कार्यक्रमाचे मार्गदर्शन राजेंद्र जावळे (सेवानिवृत्त कला शिक्षक, सेंट्रल रेल्वे स्कूल, आर्टिस्ट अँड क्रिएटिव्ह फोटोग्राफर, भुसावळ) यांनी केले. त्यांनी जुन्या व नव्या छायाचित्रणातील फरक, बदलते ट्रेंड्स, तसेच फोटोग्राफी क्षेत्रातील संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

राजेंद्र जावळे यांनी छायाचित्रण क्षेत्रात तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव घेतला आहे. त्यांनी पारंपरिक ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रांपासून ते आजच्या आधुनिक मिररलेस डिजिटल युगापर्यंतचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यांच्या मते –भूतकाळातील छायाचित्रण हे साधनांच्या मर्यादांमध्ये सर्जनशीलतेची खरी कसोटी होती.वर्तमानातील छायाचित्रण तंत्रज्ञानामुळे सर्वांसाठी सुलभ झाले आहे.तर भविष्यकाळात कृत्रिम बुद्धिमत्ता व नवनवीन तंत्रज्ञानामुळे छायाचित्रण अधिक प्रभावी होऊन जागतिक स्तरावर पोहोचेल.त्यांनी विद्यार्थ्यांना छायाचित्रण ही फक्त कला नसून ती सर्जनशीलता, दृष्टीकोन आणि अभिव्यक्तीची माध्यमे आहेत, हे अधोरेखित केले.

या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छायाचित्रणाविषयी नवीन उत्सुकता निर्माण झाली असून कलेविषयी जिव्हाळा व आदराची भावना अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. वंदना पाटील मॅडम व आभार प्रदर्शन श्री. अमोल पाटील सर यांनी केले. तसेच शाळेचे छायाचित्रकार श्री.अजय जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रम आपल्या छायाचित्रणात सुंदर फोटोंच्या माध्यमातून टिपला.


👉 आयोजक संस्था : मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर

👉 सहभाग : आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन (AVF Vision), भुसावळ

👉 मार्गदर्शक छायाचित्रकार : राजेंद्र जावळे, सेवा निवृत्त कला शिक्षक, सेंट्रल रेल्वे स्कूल, भुसावळ.

शाळेचे चेअरमन श्री. श्रीराम पाटील सर, सेक्रेटरी श्री. स्वप्नील पाटील सर आणि जॉइंट सेक्रेटरी श्री. प्रमोद पाटील सर, शाळेच्या शैक्षणिक संचालिका सौ. वनिता पाटील मॅडम यांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले .

तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. श्री. प्रवीण जी पासपोहे, खजिनदार श्री. विजय जी गोटीवांले यांनी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments