Type Here to Get Search Results !

येता आठवण ओलवी नेत्र




 खंडित व्हावी वीज अचानक 

पसरावा घरदार भर काळोख 

पेटवावी कंदील दिवटी 

पटविण्या मानवा खरी ओळख 

आज लख्ख प्रकाशीही

हरवलेत काही आपलेच चेहरे

नात्यातही उभ्या ठाकल्या भिंती

दुरावलेत सारे सगेसोयरे

मामाचे ते हरवले पत्र

कानी न येई आजीच्या गोष्टी

मतलबी या स्वार्थी दुनियेत

दुर्मिळ जाहल्या गाठी-भेटी

चार भिंतीआत जाहले मग्न

भ्रमनध्वनी घेऊनी हाती

मोहाच्या या आंतरजालेत

विसरलेत सारे नाती-गोती

सवंगड्यांचे रुसवे-फुगवे

होता कट्टी क्षणात मित्र

सुवर्ण क्षण ते बालपणीचे

येता आठवण ओलवी नेत्र..!

श्री विनोद शेनफड जाधव

मासरूळ जि बुलडाणा

Post a Comment

0 Comments