तालुका प्रतिनिधी सनिराम गावंडे
छत्रपती संभाजीनगर आदिवासी कोळी जमातीचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती दिनांक 07 ऑक्टोंबर 2025 रोजी असून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जयंती साजरी करून भव्य मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यासाठी कोळी समाज सामाजिक सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर तर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजता बाथ्री तेली समाज भवन / मंगल कार्यालय, जुना मोढा, छत्रपती संभाजीनगर येथे आदिवासी कोळी जमात बांधवांची बैठक घेण्यात आली सदर बैठकीमध्ये आदिवासी कोळी जमात महर्षी वाल्मिक ऋषी सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025, छत्रपती संभाजीनगर (वर्ष 02 रे) स्थापन करुन जयंती उत्सव समितीची कार्यकारणी निवडकरण्यात आली. निवड करण्यात आलेली कार्यकारणी खालील प्रमाणे. अध्यक्ष :- गणेश अशोक चकाले, कार्याध्यक्ष :- ॲङ योगेश सुरडकर व आकाश राजेंद्र मुदिराज, सचिव :-विजय लक्ष्मण फुले, उपाध्यक्ष :- विजेंद्र इंगळे व उदय कोळी, कोषाध्यक्ष :- गोरख कचरू शिनगारे, सहसचिव :- अंबादास भोंडेकर व सतिष नागकिर्ती, सभासद :- श्री. विजय कोळी, संतोष पिठलेवाड, राहूल वाघ, कमलेश मुदिराज, सचिन गोदे, संभाजी शिंदे या प्रमाणे कार्यकारणी गठीत करुन निवड करण्यात आली सदर जयंती योग्यरित्या पार पाडणेसाठी वरील जयंती उत्सव समिती अंतर्गत काम करणेसाठी एकुण सहा समित्या तयार करण्यात आल्या आहेत त्या खालील प्रमाणे.
1. जयंती उत्सव मार्गदर्शक / सल्लागार समिती.
2. जंयती उत्सव महिला समिती.
3. जयंती उत्सव मिरवणुक नियोजन समिती.
4. जयंती उत्सव स्टेज नियोजन समिती.
5. जयंती उत्सव भोजन नियोजन समिती.
6. जयंती उत्सव देणगी जमा करणे व खर्च हिशोब सादर करणे समिती
याअनुषंगाने सदर बैठकीमध्ये वरील निर्णय घेण्यात आले तसेच सदर बैठकीचे सुत्र संचलन श्रीमती. अनिता मुदिराज मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. मनोज शिंदे यांनी केले तसेच सदर बैठकीला खालील प्रमाणे जमात बांधव उपस्थित होते. प्रमोद भोंडेकर, गिता मुळे, विशाल कोळी, रुख्मण गोडदे, मनोहर मुदिराज, अनिल भोंडेकर, राजेंद्र जाधव, शिवाजी शिंदे, सुजाता भोंडेकर, प्रियंका शिंदे, बाबासाहेब घाडगे, जयश्री मुळे, संजीव इंगळे, योगेश नवसारे, देविदास गवळी, धीरज सोनवणे, अमित चकाले, संजय खेडकर, संजय वाडे (आयोजक)कोळी समाज सामाजिक सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर (आयोजित) आदिवासी कोळी जमात महर्षी वाल्मिक ऋषी सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 छत्रपती संभाजीनगर आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

Post a Comment
0 Comments