रावेर तालुका प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
निंभोरा येथील सौ.डि.आर. चौधरी माध्यमिक विद्यालयामधे श्रीमती योगिता चौधरी मॅडम यांच्या संकल्पनेतून पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करता यावा. या दृष्टिकोनातून पर्यावरण पुरक गणपती निर्मिती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत योगिता चौधरी मॅडम यांनी गणेशाची मुर्ती कशी घडवावी याचे मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहपुर्वक गणपती बाप्पाची मुर्ती तयार करुन याच मुर्ती गणेशोत्सवात ठेवुनगणेशोत्सव. साजरा करु व आपले पर्यावरण वाचवु. असा संदेश या कार्यशाळेतून सर्वाना दिला.यावेळी मुख्याध्यापिका शाळेच्या सायराबानो खान , हेमलता नेमाडे चंद्रकांत देशमुख, नरेंद्रकुमार दोडके, सरफराज तडवी, योगिता चौधरी व गौरव नेमाडे, मुकुंदा फालक तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments