Type Here to Get Search Results !

वात्रटिका



विरोधकांनी विचारांची आता

गाठली निचांकी पातळी आहे 

लष्करावर संशय घेण्याची त्यांच्या 

डोळ्यावर चढली काजळी आहे 


विरोधकांच्या मते शिंदूर नावात

दडला काहीतरी घोळ आहे 

जया बच्चननी संसदेत रोज 

म्हणे घातला गदारोळ आहे 


कोण दोषी कोण निर्दोष हा तर

तपास व्यवस्थेचाच भाग आहे 

कोणाच्या डोळ्यात आनंदाश्रू 

तर कोणाच्या बुडाला आग आहे

तपासानंतर मुजावर यांच्या 

बोलण्याला आता काही अर्थ आहे 

हायकोर्टात जाण्याचा ओवैशी 

यांचा सल्ला ही तसा व्यर्थ आहे 



कवी आनंद भारमल 

खंडाळा बावडा 

Post a Comment

0 Comments