Type Here to Get Search Results !

अजंदे ते कांडवेल रस्त्याला झुडपांचा वेढा – संबंधित विभागाचे दुर्लक्ष!



रावेर तालुका प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे

रावेर तालुक्यातील अजंदे ते कांडवेल या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असून आता रस्त्यालगत मोठमोठी झुडपे व काटेरी झाडांचा अक्षरशः वेढा निर्माण झाला आहे. या झुडपांमुळे वाहनचालक व पादचारी यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे.रस्त्याच्या कडेला झुडपे वाढल्याने अपघातांचा धोका कायम आहे. दोन वाहनांना क्रॉसिंग घेताना दृष्टीआड होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हीच परिस्थिती अधिक धोकादायक ठरते.

स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा संबंधित विभागाचे लक्ष वेधले असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट होत असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या रस्त्याने वाघाडी, धामोडी कांडवेल, शिंगाडी अशा गावांचा तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता असून सदरील ग्रामस्थांचा इशारा आहे की, लवकरच साईड पट्ट्यांनवरील झुडपे साफ करून रस्ता स्वच्छ करण्यात आला नाही तर रास्ता रोकोसारखे आंदोलन छेडण्यात येईल. प्रवासी व ग्रामस्थांनी रस्त्याच्या तातडीने दुरुस्ती व झुडपांची छाटणी करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments