Type Here to Get Search Results !

ना. दत्तात्रय भरणे यांनी केली पूर परिस्थितीची पाहणी आ, कोहळीकर यांनी दिली सविस्तर माहिती



हदगाव . विठ्ठल कदम शिवपुरीकर 

हदगाच तालुक्यातील गेल्या चार दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे हदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे शेकडो हेक्टर बरील पिके पाण्याखाली गेली आहेत अशा परिस्थितीतील पूयस्त शेतकरी आणि ग्रामस्थांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी म हाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे २० ऑगस्ट रोजी हदगाव विधानसभा क्षेत्रातील करमोडी येथे आम दार बाबुराव कदम कोहळीकर यांनी या पुरामुळे व अतिवृष्टीम ळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विविध गावांना भेटी दिल्या पूरग्रस्त नागरिकांना भेट घेऊन त्यांच्य अडचणी जाणून घेतल्या त्यावेळी त्यांनीनुकसानग्रस्त शेती पिके व घरे रस्त्यांची पाहणी करून ना कृषिमंत्रीमंत्री महोदयांशी व जिल्हाधिका-यांशी चर्चा केली पूरग्रस्त नागरिकांपर्यंत तातडीने सर्वतोपरी मदत पोहोचण्याचासूचना दित्त्वा तसेच सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी पुरस्थिती किती गंभीर आणि भीषण आहे, याची प्रत्यक्षमाहिती मंत्री महोदयांना दिली गेली.

या पाहणी दौऱ्यात मा.खा सुभाषराव वानखेडे, जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. निलकुमार महावीर ऐतवडे, उपविभागीय अधिकारी श्री. अविनाश कांबळे, शिवसेना जिल्हाप्रम श्री. वियेक देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. किशोर देशमुख, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब रावणगावकर, श्री. अनिल पाटील बाभळीकर, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. संदेश पाटील हडसणीकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. शीतलताई भांगे पाटील तसेच आजी-माजी महायुतीचे पदाधिकारी आणि तालुक्यातील अधिकारी होते..

Post a Comment

0 Comments