Type Here to Get Search Results !

रावेर तालुक्यात पावसाचा कहर; पिके जमीनदोस्त केळीचे मोठे नुकसान.



रावेर तालुका प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे.

संततधार पावसाने रावेर तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोमवारी पूर्वरात्रीपासून तब्बल १२ तास कोसळधार पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालं असून, शेती पाण्यात गेली, जनावरे मृत्युमुखी पडली आणि अनेक घरांची पडझड झाली आहे. नागझिरी, सुकी, मात्राण नद्या आणि नाले ओसंडून वाहत असल्याने गावागावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.अतिवृष्टीतील तालुक्यातील महापुरात व वादळी पावसात केन्हाळे, रसलपूर, मोरगाव, अजंदे, नांदुरखेडा व निंबोल शिवारातील केळीचे ४२.७० हेक्टर क्षेत्र तसेच अजंदे, नांदुरखेडा,५शेळ्या बक्षीपूर येथील नरेंद किसन महाजन यांच्या दगावल्या.

निंबोल शिवारातील ५७.५० हेक्टर कपाशीचे क्षेत्र तर मक्याचे चोरवड, खानापूर, अहिरवाडी व अजंदे येथील १६.२५ हेक्टर क्षेत्र असे एकूण १२१.२५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. तद्वतच लालमाती, शिंगाडी, गोलवाडे, उटखेडा बक्षीपूर, केर्हाळे व जुनोने येथील ११ घरांचे अंशतः नुकसान तथा बक्षीपूर येथील नरेंद किसन महाजन यांच्या ५ शेळ्या पावसाच्या पुराने भिंत कोसळून दबल्या गेल्या आहेत. एकूण बक्षीपूर येथील शेतकरी नरेंद्र किसन महाजन यांच्या घराजवळील शेताचा बांध फुटून, पुराचे पाणी घरात घुसले. या घटनेत भिंत व छत कोसळून १ शेळी, १ बोकड आणि ३ पारड्या जागीच मृत्युमुखी पडल्या. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.

Post a Comment

0 Comments