रावेर ता.प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
रावेर तालुक्यातील खिर्डी येथील बसस्टॉप परिसरात विवरा रोड पासून ते जेडीसीसी बँक पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सदरील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असून वाहनधारकांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होत असतो.
तसेच खड्डयांमध्ये साचलेल्या पाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी पूर्वक लक्ष देवून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी खिर्डी येथील ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारक करीत आहे.

Post a Comment
0 Comments