गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी
महादेवी हत्तीण परत द्या, मागणीसाठी डोणगाव येथे शांततेत मिरवणूक डोणगाव. आमची महादेवी हत्तीण परत द्या, परत द्या, असा एकच नारा देत डोणगाव येथे दिनांक 3 ऑगस्ट सोमवार रोजी येथील दिगंबर जैन समाज डोणगाव व माजी मंत्री सुबोध सावजी माजी सभापती महिला बालकल्याण जिल्हा परिषद सौ सायली सावजी डोणगाव ग्रामपंचायतचे सरपंच चरण आखाडे डोणगाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष विष्णू पळसकर व दिगंबर जैन समाज अध्यक्ष डोणगाव मधुकर बोराळकर व सर्व पदाधिकारी यांनी डोणगाव जैन समाज माता भगिनी व पुरुषांसह माधुरी हत्तीन वापस मिळालीच पाहिजे या मागणी करता डोणगाव शहरातून प्रभात फेरी मार्गाने शांतता मागणी मिरवणूक काढली मिरवणुकीमध्ये हजारो महिला पुरुष उपस्थित होते नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तिणीला पोलिस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी डोणगाव येथे मिरवणूक काढण्यात आली व महादेवी हत्तिणीचा ताबा परत स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठाकडे द्यावा, यासाठी मूक मिरवणूक काढण्यात आली यावेळी डोणगाव येथील जैन बांधव व महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. .

Post a Comment
0 Comments