गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगाव :- शेतकऱ्यांच्या शेतातील हैदोस घालणारे वन्यप्राणी वनतारामध्ये घेऊन जावे असे पत्रच कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी वनतारा चे संकल्पक उद्योग पती अनंत अंबानी यांना दि. ४आँगस्ट दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रात आपण महादेवी माधुरी हत्तीनी कोर्टाच्या आदेशाने आपले कडे सांभाळ करण्याकरिता घेतली याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात हैदोस घालणारे रानडुकरे , हरीण , रोही याप्रमाणे इतरही जनावरे आपण पकडून आपले वन तारा ह्या आपल्या शौका खातर उभारलेल्या वनतारा या अभयारण्यात घेऊन जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments