Type Here to Get Search Results !

सागर भैय्या बेग यांची यशस्वी मध्यस्थी; शुक्रवारचा बाजार जुन्याच ठिकाणी भरणार



प्रतिनिधी – अहिल्यानगर

श्रीरामपूर शहरातील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या शुक्रवारच्या मुख्य बाजारासंदर्भात स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अक्षय कॉर्नर, संजीवनी हॉस्पिटल परिसरातून बाजार हटवून म्हाडा वसाहतीमध्ये हलवण्याचा अतिक्रमण विभागाचा प्रस्ताव स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांच्या मध्यस्थीने शांततेत थांबवला.

मोरगे वस्तीतील सुमारे साडे तीनशे रहिवाशांनी बाजार पूर्वीप्रमाणेच भरवण्याची मागणी करत सह्यांचे निवेदन सागर बेग यांच्या हस्ते मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप यांना दिले. या निवेदनात बाजारामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्याचे नमूद करण्यात आले असून, फक्त आतील रस्त्यावर विक्रेते बसू नयेत अशी सूचना करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी घोलप यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्व मुद्दे मांडण्यात आले आणि त्यांनी बाजार पूर्वीप्रमाणेच भरवण्यास मान्यता दिली. व्यापाऱ्यांच्या जागेच्या प्रश्नावर सागर भैय्या बेग यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाल्याने व्यापारी वर्ग आणि स्थानिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

व्यापाऱ्यांनी सांगितले की, नवीन ठिकाणी (म्हाडा वसाहत) बाजार भरल्यास शेतकरी बांधवांचे आणि व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असते. यावेळी राजेश वाव्हाळ, सुनील पाचोणे, नितीन शिररसाठ यांच्यासह अनेक व्यापारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments