Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सणानंतरही राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा



79 वा स्वातंत्र्यदिवस संपूर्ण भारतामध्ये अतिशय आनंदाने व प्रसन्नतेचे साजरा करण्यात आला.देशभक्तीपर,गौरवशाली गाण्यांनीगल्ली पासून ते दिल्ली पर्यंत वातावरण दुमदुमले.शाळकरी मुले,महाविद्यालयीन तरुण तरुणी,शासकीय कर्मचारी व इतर नागरिक सकाळी लवकर उठून ध्वजारोहणासाठी तयारी करून हजर झाले.रस्त्या- रस्त्यावर आपल्या देशाच्या राष्ट्र ध्वजाचे प्रतीक असलेले खिशाला लावण्यासाठी बिल्ले,तीन रंगांचे फुगे त्याचबरोबर नायलॉन, प्लास्टिक व कागदी झेंडे यांचे दुकाने थाटलेले दिसत होते.हर घर तिरंगा या अभियांना अंतर्गत संपूर्ण भारतात घरोघरी झेंडे लावले. भ्रमन ध्वनीमध्ये सेल्फी कैद केल्या.शाळकरी मुले,कर्मचारी राष्ट्रध्वजाचे प्रतीक असलेले बिल्ले खिशाला लावून अभिमानाने मिरवत होते.काही दुचाकी व इतर वाहनांवर झेंडे लावलेले दिसून येत होते. त्याचप्रमाणे काही दुकानांना तिरंगी फुगे लावून सजवलेले दिसून येत होते.देशप्रेमाने प्रेरित होऊन समस्त भारतीय नागरिक ज्याच्या त्याच्या परीने देशाला व सैनिकांना मानवंदना देत होते काही चित्रकार,वाळू कलाकार,निसर्गप्रेमी त्यांच्या कलेतून राष्ट्रध्वजाला सलामी देऊन आपापली कला सादर करत होते. ऑपरेशन सिंदूर चे प्रतिकात्मक पोस्टरर्स लावून शूर सैनिकांना मानवंदना देत होते. अर्थात प्रत्येक भारतीय नागरिक देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाप्रती आदर, प्रेम व्यक्त करत होता.हे मनमोहक दृश्य बघून मन दिवसभर अगदी प्रसन्न झाले.

 देशाची राजधानी दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती,पंतप्रधान सहित तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित होते.त्याच प्रमाणे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणारे सर्व सैनिक मोठ्या उत्साहाने आपला"राष्ट्रीय सण" साजरा करण्यासाठी उपस्थित होते.त्याचप्रमाणे संपूर्ण भारतातील कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून भारतीय ध्वजाला सलामी देत होते.स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून खरोखरच हा नयनराम्य सोहळा बघून अतिशय अभिमानास्पद असे चित्र दिसून येते. सध्याच्या काळात समाज प्रसाराच्या माध्यमातून नागरिक एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत होते. टीव्ही चॅनलवर स्वातंत्र्यदिनानिमित्त दिवसभर वेगवेगळ्या स्वरूपाचे देशभक्तीचे प्रदर्शन चालू होते. दरवर्षी सायंकाळी नेहमीप्रमाणे शाळा,महाविद्यालय शासकीय निमशासकीय कार्यालये व सहकारी संस्था आपल्या राष्ट्रध्वजाला सन्माणाने खाली उतरवतात व सन्मानाने जतन करून ठेवतात.

 स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संपूर्ण भारतभर देशाच्या तिरंगा ध्वजाचा सन्मान राखला गेला.हल्ली भारतीय ध्वजाचे प्रतिक म्हणून तिरंगा अश्या वास्तू साहित्य जसे की,प्लॅस्टिक,कागदी ध्वज, पितळी बिल्ले, तीन रंगांचे फुगे वापरून आपला राष्ट्रीय सण अगदी उत्साहात सर्वजण साजरा केल्या जात आहे.ही अतिशय आनंदाची बाब आहे मात्र,आपल्या दुचाकी,चारचाकी अथवा इतर वाहनां वर जे प्लास्टिकचे ध्वज लावलेल्या असतात त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.काही तांत्रिक कारणामुळे राष्ट्रध्वज तुटतो,मुलांच्या हातातून उडून पडतो,खिशाचा राष्ट्रध्वजाचा बिल्ला खाली पडतो त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी दुचाकी,चारचाकी उभी केली असता भटकी जनावरांकडून किंवा हवेमुळे खाली पडतो.ते तसेच जमिनीवर पडून राहतात. हवेबरोबर इतरत्र उडून कचऱ्याच्या ठिकाणी पडतात. झाडांच्या फांद्यामध्ये अडकतात.तुटतात, फाटतात.कालांतराने आपला प्राणप्रिय राष्ट्रध्वज पायदळी येऊन त्याचा अवमान होण्याची शक्यता असते म्हणून शाळकरी मुले,महाविद्यालयीन तरुण तरुणी,कर्मचारी व इतर नागरिक यांनी वैयक्तिक व सार्वजनिक ठिकाणी आपला राष्ट्रीय ध्वज व इतर भारतीय ध्वजांची प्रतिके असलेले साहित्य सन्मानाने,जीर्ण व खराब होण्याअगोदर उतरून किंवा काढून ठेवावी.जेणेकरून जमिनीवर पडून,पायदळी येऊन त्यांचा अवमान होणार नाही,याची काळजी घ्यायला घ्यावी. अशा प्रकारे फक्त स्वातंत्र्यदिनीच नाहीतर,प्रत्येक दिवशी कायम राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा.जय हिंद!

श्री विनोद शेनफड जाधव 

मासरूळ जि बुलडाणा 

Post a Comment

0 Comments