जनजागृती अभियान प्रसारक सौ उमाताई वहाडणे ताई याचं प्रतिपादन
आत्मा मलीक माध्यमिक विद्यालय गुरूकुल कोकमठाण येथे ज्ञानेश्वरी ग्रंथातील पसायदान जन जागृती हि दैनंदिनी शाळेतील विद्यार्थ्यांना दररोज सकारात्मक ऊर्जा तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथातील पसायदान महत्वाचे आहे सामाजिक समरसता मंच उत्तर अहिल्यानगर जिल्हा *आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल,कोकमठाण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज/माऊली व त्यांची भावंडे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज,संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज,संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.लहान गट,मोठा गट-प्रथम तीन क्रमांकांना सदर समितीच्या वतीने प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची जोपासना होऊन त्यांच्या द्वारा राष्ट्रसेवा होऊन देशाच्या विकासासाठी त्यांचे योगदान लाभो,सुजाण नागरिक तयार व्हावेत,या भावनेने सदर मंच कार्य करत आहे.यासाठी कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन! माऊलींच्या कृपाशिर्वादासह पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून अनंत-अनंत हार्दिक शुभेच्छा!
संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रार्थना स्वरूप पसायदान रचनेला साडेसातशे वर्ष पूर्ण झाल्याने 13 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2025 संपूर्ण राज्यभर पसायदान अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहेया मुळे मुलांच्या शिक्षणासाठी आध्यात्मिक प्रगती साठी एक उच्च स्तरावर सकारात्मक बदल नक्कीच घडवून येईल , आत्मा मलीक माध्यमिक विद्यालय गुरूकुल कोकमठाण या शाळेत नेहमी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण दिल्याने या शाळेचे नाव देशात प्रसिद्ध असुन या शाळेतील शिक्षक वर्ग नेहमी विद्यार्थ्यांना उचित शिक्षणासाठी प्रयत्नशील असतात सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील चव्हाण मॅडम, पिंगळे मॅडम, हाडोळे मॅडम, कहाडळ सर, चव्हाण सर आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी १)सौ.लताताई भामरे-सेवानिवृत्त मुख्याध्यापिका,राष्ट्रसेविका समिती, कोपरगाव तालुका बौद्धिक प्रमुख, उत्कृष्ट वक्ता २)सौ.मिराताई शिंदे-राष्ट्रसेविका समिती कार्यकर्त्या ३)सौ.निर्मला भगतताई ४)सौ.उषाताई शिंदे सेवा प्रमुख ५)सौ.रेखाताई गवते ६)सौ.उमाताई वहाडणे-सामाजिक समरसता मंच-जिल्हा सदस्य, राष्ट्र सेविका समिती संपर्क प्रमुख.

Post a Comment
0 Comments