रावेर तालुका प्रतिनिधी:-भिमराव कोचुरे
सावदा येथील बैठकीत विविध कार्यकर्त्यांच्या नेमणुका जाहीर
बिहार सारख्या राज्यात नाभिक समाजाचे बिहारचे पुत्र ओबीसी नेते प्रणेते जननायक करपुरी ठाकूर हे मुख्यमंत्री होऊ शकतात परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगत पुरोगामी राज्यात मात्र ओबीसी भटके गरीब समाज बांधवांना आमदार खासदार नगरसेवक म्हणून तरी सन्मानाने जगण्याचा प्राथमिक सुविधा न्याय मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सावदा येथे भारतीय किसान संघटनेचे ओबीसी जनकल्याण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी मत व्यक्त केले.
आज रोजी सावदा येथील शासकीय विश्राम गृहावर ओबीसी जनकल्याण संघ आणि भारतीय किसान संघटनेची प्रदेश अध्यक्ष प्रशांत बोरकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक झाली यावेळी विविध पदांचे पदभार घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ओबीसी जनकल्याण संघाचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री सुरेश ठाकरे यांची निवड करण्यात आली यावेळी शेख रऊफ शेख नजीर यांचा भारतीय किसान संघटन मुक्ताईनगर विधानसभा अल्पसंख्यांक सेल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली ओबीसी जनकल्याण संघावर गोपाल नाथ बाबा यांची रावेर तालुका उपाध्यक्ष म्हणून भारतीय किसान संघटनेच्या आदिवासी सेल तालुका अध्यक्षपदी शिवराज व्यंकट भिल यांची सी काळेराम परदेशी यांची सावदा शहराध्यक्ष म्हणून श्री रमेश नेमा कपले यांची फैजपुर शहर अध्यक्ष ओबीसी संघटना आदी विविध नेमणुका नियुक्त्या करण्यात आल्या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री संजय चौधरी पत्रकार श्री परदेशी श्री नाथजोगी श्री चौधरी सह असंख्य छोट्या ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment
0 Comments