रावेर प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील गरजूंना त्वरित प्लॉट द्यावेत, अशी मागणी शरद तायडे यांनी आ. अमोल जावळे यांच्याकडे केली आहे.
निंभोरा बुद्रुक येथील गट क्रमांक लावली ७३० मधील लाभार्थी यादी ग्रामपंचायतीने होती. त्या अनुषंगाने रावेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील इंजिनिअर प्रकाश वानखेडे हे निंभोरा गावामध्ये ले-आउट टाकण्यासाठी आले होते. या वेळी काही समाजकंटकांनी त्यांना धमकवण्याचे काम केले होते. त्यामुळे ते प्रकरण पेंडिंग पडले होते. या संदर्भात आ. अमोल जावळे यांची भेट घेऊन त्यांना शरद तायडे यांनी निवेदन दिले. याबाबत रावेर पंचायत
समितीचे बीडीओंना फोन लावून चर्चा केली. तर निंभोऱ्यातील प्लॉट वितरणचा विषय मार्गी लावा, अशा त्यांनी सूचना केल्यात. या वेळी महेश चौधरी, कमलाकर तायडे यांनी ही आ. अमोल जावळे यांना निंभोऱ्यातला विषय मार्गी
लावून द्या, असे सांगितले. तर आमदारांनी त्यास होकार दिला आहे, असे शरद तायडे यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments