प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झालेले असतानाही यंत्रणेकडून तपास सुरू असताना एक खबर नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत परिसरामध्ये अवैद्यरित्या पंजाब राज्यात विक्री होत असलेला विदेशी मद्याचा साठा हा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून 11 लाख रुपये किमतीचा अवैद्य विदेशी मध्ये साठा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे
या कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस हवालदार विनोद टिळे, संदीप नागपुरे, सतीश घुटे, तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे आदींच्या पथकांनी कारवाई केली आहे

Post a Comment
0 Comments