प्रतिनिधी अंशुल जिचकार
लकडगंज, क्वेटा कॉलनी येथील श्री नागपूर गुजराती मंडळाद्वारे संचालित श्री उमियाशंकर नारायणजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष शांतिभाई बदानी यांच्या स्मृति प्रित्यर्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत 27 शाळेतील 54 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. चित्रकलेचा विषय 'मनः शांती आणि शरीरासाठी योगा' होता.विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य आणि कल्पनेने चित्र साकारले होते. रनिंग ट्राफी सी.बी.आदर्श हायस्कूलने पटकाविली. प्रथम क्रमांक ऊर्वी कानोजे,द्वितीय क्रमांक मुग्धा वासुले ,तृतीय क्रमांक शर्वरी उमरेडकर तथा प्रोत्साहनपर पुरस्कार पारेख स्पोर्ट्स द्वारे स्वारंगिनी पराते, त्रिशा बोकडे, ओजस्विनी मुल्लेवार यांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या परीक्षक नेहा मालवे आणि कृणाल धनजोडे होते.बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी, संस्थेचे अध्यक्ष योगेश पटेल, उपाध्यक्ष नरेंद्र झा , महेंद्र पटेल, सचिव चंद्रेश बदानी ,खेतालाल पटेल, रोहित पटेल , योगेश जोशी आणि सीईओ हर्षा खख्खर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंशुल जिचकार यांनी केले.

Post a Comment
0 Comments