Type Here to Get Search Results !

करणवाडी जवळ ऐका बिअर बार वर चोरी



मारेगाव/प्रदीनिधी

मारेगाव तालुक्यातील करणवाडी नजीकच्या एका बिअरबार मध्ये शटर फोडून चोरट्यांनी विदेशी दारू सह रोख रकमेवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना आज मंगळवारला सकाळी उघडकीस आल्याने बिअरबार चालकाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मारेगाव येथील बिअरबार संचालक विनीत जयस्वाल यांचे मालकीचे रघुकूल बिअरबार व रेस्टॉरंट करणवाडी येथे असून या बार मध्ये मध्यरात्री चोरट्यांनी चक्क सब्बलने शटर फोडून प्रवेश केला. प्रवेश दर्शक असलेल्या सिसिटीव्ही कॅमेरा फोडून या सराईत गुन्हेगारांनी आत प्रवेश करीत महागड्या विदेशी दारूच्या बाटल्या व रोख 15 हजार रुपये असा जवळपास 40 हजार रुपयाचा मुद्देमालावर हात साफ केला.चोरट्यांनी आत मध्ये यथेच्छ सिगारेटचे झूरके ओढतांना आतील सिसिटीव्ही कॅमेरात तब्बल पाच सराईत गुन्हेगार कैद झाले.

दरम्यान, हे सराईत चोरटे परप्रांतातील असल्याचा कयास व्यक्त होत आहे. बार संचालक विनीत जयस्वाल यांच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार शंकर बारेकर तपास करीत असून शहरातील बार चालकात या चोरट्या घटनेने दहशत व भितीचे सावट पसरले आहे.

Post a Comment

0 Comments