Type Here to Get Search Results !

मार्डी सर्कलमधील देवाळा ग्रामस्थांचे मारेगाव तहसीलसमोर आमरण उपोषण



मारेगाव/अतुल कोवे

मारेगाव तालुक्यातील मार्डी सर्कलमधील देवाळा  ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी मारेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

या उपोषणातील प्रमुख मागणी म्हणजे मार्डी ते देवळा रस्त्याचे नूतनीकरण आणि देवाळा ते खैरगाव शेतीमार्गाची सुधारणा करण्यात यावी ही आहे.

अमृत देवळकर यांनी प्रशासनाचे दुर्लक्ष आणि विकासकामांतील विलंबाविरोधात आवाज उठवत सांगितले की, “झोपी गेलेल्या प्रशासनाला उठवण्याचा एकमेव मार्ग आमरण उपोषणच आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील.”

ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाकडून तातडीने प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments