प्रतिनिधी संदीप भिवनकर
गडचिरोली : चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यात गेल्या काही दिवसांत वाघाच्या हालचाली वाढल्या असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे तसेच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वन विभागाच्या पथकाने चामोर्शी तालुक्यातील तसेच मुलचेरा तालुक्यातील येनापुर, दुर्गापुर, मुधोली चक नं. 2.लक्ष्मणपुर, गोलकर मुचोली, जैरामपुर, रामपुर, कढोली, अनखोडा, उमरी, चंदनखेडी, रायपुर, रामकृष्णपुर, बहादुरपुर, गुंडापल्ली, सुभाषग्राम, अडपल्ली, कोनसरी, कन्हाळगाव, रविंद्रपुर, धर्मपूर, सोमनपल्ली, आंबोली, वायगांव या गावाजवळील जंगल परिसर मध्ये वाघाचा वावर असल्यामुळे परिसरात वाघाचे पगमार्क आणि हालचालींचे पुरावे आढळल्याचे सांगितले.
वन विभागाची नागरिकांना *सूचना*
*संध्याकाळीनंतर आणि पहाटे एकट्याने जंगल मार्गावर जाणे टाळावे..*
*पाळीव जनावरे खुले सोडू नयेत..*
*वाघ दिसल्यास घाबरून पळू नये..*
*जवळ जाऊन फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू नये..*
*त्वरित जवळच्या वन अधिकाऱ्यांना माहिती द्यावी*
*ग्रामस्थांनी शक्यतो समूहाने वावर करावा..*
वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले की, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाशी संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment
0 Comments