ईश्वरपूर /प्रतिनिधी
आपण उरूण ईश्वरपूर नगरपालिकेची सत्ता माझ्या सहकाऱ्यांच्या हातात द्या,आपले नगराध्यक्ष वर्षातून दोन वेळा त्यांचे सहकारी नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्येक प्रभागात जातील,तेथे आमसभा घेऊन तेथील नागरिकांशी संवाद साधतील,त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते मार्गी लावतील,असा विश्वासही माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी उरूण ईश्वरपूर येथील कोपरा सभेत व्यक्त केला. आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ७ च्या आत घरात जाणारा आणि एसी गाडीतून फिरणारा नाही,तर आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्कुटरवरून फिरणारा,कोणीही हात दाखवेल तिथे थांबून नागरिकांचे प्रश्न समजून घेणारा आहे,असा टोलाही त्यांनी दिला.
महादेवनगर येथे प्रभाग क्रमांक २ मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार,माजी नगरसेवक डॉ.संग्राम पाटील, श्रीमती लताताई दिलीपराव कुर्लेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, पै.भगवान पाटील,प्रा.शामराव पाटील,राज्य सरचिटणीस अरुण कांबळे,मुनीर पटवेकर, शंकरराव चव्हाण,निवास पाटील,रोझा किणीकर,काँग्रेस पक्षाचे राजेंद्र शिंदे,शाकीर तांबोळी,अँड.आर.आर.पाटील,अँड.आकीब जमादार, गणेश शेवाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले,आता चार-दोन दिवसात राज्याचे बडे नेते,मंत्री आपल्या शहरात येतील. तुम्हाला चंद्र देतो,सुर्य देतो असे सांगतील. आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पडेल. मात्र त्यांनी गेल्या नऊ वर्षात त्यांच्या कडे सत्ता असतानाही या शहराच्या विकासा साठी किती निधी आणला? या शहरात एखादे ठळक असे काम केले का? त्यांना या शहराच्या विकासाशी,तुमच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नाही. शेवटी हे आपले शहर तुम्हाला आणि मलाच हातात- हात घालून दुरुस्त करावयाचे आहे. तुतारी वाजविणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा.
आनंदराव मलगुंडे म्हणाले,आम्ही माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शना खाली दशपुर्ती हा जाहीरनामा ताकदीने राबवू. आ.जयंतराव पाटील यांच्या माध्यमा तूनच या शहराचा विकास झाला आहे,हे वास्तव आहे. मात्र विरोधकांनी या शहराची गेल्या ९ वर्षात दुर्दशा केली आहे. आपण पुन्हा हे शहर दुरुस्त करूया.
डॉ.संग्राम पाटील म्हणाले,आपला परिसर हा या शहराचा मलबार हिल आहे. आम्ही या परिसराला चांगली सेवा देण्यास प्राधान्य दिले आहे. या शहरातील गुंठेवारीबद्दल ठोस धोरण घेऊ. यावेळी संजना पतंगे,रुपाली सुहास वाटेगावकर यांची भाषणे झाली.
यावेळी संदीप पाटील,प्राचार्य राजेंद्र कुरळपकर,तानाजी खराडे,अभिजित कुर्लेकर,माजी नगरसेवक सौ.निलिमा कुशिरे, रुपाली पाटील,राजनंदिनी घाडगे, मालन वाकळे,सुप्रिया कांबळे,सुनिता संग्राम पाटील, गिता पाटील,भिमराव पाटील,आर.एस. जाखले,आर.ए.पाटील,तानाजी सलगर, पै.गुलाब पाटील,विक्रम घाडगे,विनायक सदावर्ते यांच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments