इस्लामपूर / प्रतिनिधी
कापूसखेड ता. वाळवा येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री १२ वा. पारंपारिक पध्दतीने थाटात पार पडला.
तब्बल महिनाभर चालणा-या श्रींच्या मंगल विवाह सोहळयाचा प्रारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्या हळदी समारंभाने झाला.तुलसी विवाहादिवशी १२ दिवसांचे घट उठविल्यानंतर नवरात्रीच्या उपवासाची सांगता झाली. सकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. दरम्यान रात्री १२ वा. अंतरपाट धरून पारंपारिक पध्दतीने मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाह सोहळा थाटात पार पडला

Post a Comment
0 Comments