फोटो ओळी : इस्लामपूर : हुतात्मा रंगा गायकवाड यांच्या पत्नी कमल गायकवाड यांना पेन्शन प्रदान करताना प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील आणि कॉ. धनाजी गुरव. मंचावर सोबत प्रा.बाबुराव लगारे, शरद पाटील, अँड. अजित सूर्यवंशी, डॉ. नितीन शिंदे आणि दिगंबर कांबळे.
इस्लामपूर / प्रतिनिधी
'आजूबाजूची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी विचारांच्या बळावर लढण्याचा मंत्र डॉ. एन.डी.पाटील यांनी आपणाला दिला आहे. आज परिस्थिती कमालीची प्रतिकूल आहे. तिला शरण जाऊ नका. जातीच्या धर्माच्या नावावर माणसामाणसात भेदाच्या भिंती उभा करणारे पैसाकेंद्री राजकारण सुरु आहे. त्याला माणूसकेंद्री राजकारणाने उत्तर देऊया.' असे प्रतिपादन अँड. सुभाष पाटील यांनी केले.
येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये १९७२ च्या दुष्काळविरोधी लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या चार हुतात्म्यांच्या त्रेपन्नाव्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन आणि पेन्शन प्रदानासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कॉ.धनाजी गुरव कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
हुतात्मा रंगा गायकवाड यांच्या पत्नी कमल गायकवाड यांना यावेळी वार्षिक पेन्शन प्रदान करण्यात आली. बी.जी.पाटील, भाई संपतराव पवार, प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील, प्रा.बाबुराव लगारे, अँड. अजितराव सूर्यवंशी, भाई शरद पाटील, दिगंबर कांबळे यांची यावेळी भाषणे झाली. अँड. महेश पाटील, प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, प्रा. एल.डी.पाटील, रवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. एकनाथ पाटील यांनी स्वागत केले. सागर रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र साखरे यांनी आभार मानले.

Post a Comment
0 Comments