Type Here to Get Search Results !

चारित्र्याच्या संशयावरूनच महिलेचा खून


तीन दिवसानंतर मृतदेह सापडला : संशयीत ताब्यात

ईश्वरपूर /प्रतिनिधी

बोरगाव ता. वाळवा येथे रसिका मल्लेश कदम (वय ३५, रा. नवीन बहे नाका, ईश्वरपूर) या बेपत्ता महिलेचा मृतदेह साटपेवाडी बंधा-याजवळ शुक्रवार दुपारी कृष्णा नदीपात्रात सापडला. या महिलेचा चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संशयीत तुकाराम शंकर वाटेगावकर (वय ३८ रा बोरगाव ता. वाळवा ) याच्यावर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ईश्वरपूर येथील रसिका कदम ही खानावळीत व धुणी भांडयाचे काम करत होती. संशयीत आरोपी तुकाराम वाटेगावकर या दोघांची पाच ते सहा वर्षापुर्वी यातूनच ओळख झाली होती. काही दिवसापुर्वी रसिका हिने वाटेगावकर याचा नंबर ब्लॉक केला होता. या करणावरून वाटेगावकर याने कदम यांच्या घरासमोर जावून दमदाटी केली होती. यावेळी कदम यानी इस्लामपूर पोलिसात तक्रार ही दिली होती.

 वाटेगावकर हा तीच्यावर संशय घेत होता. मंगळवार दि. ४ रोजी वाटेगावकर हा त्याच्या दुचाकीवरून ईश्वरपूर येथे रसिका हिच्या घराकडे आला होता. यानंतर दोघेजण दुचाकीवरून बोरगाकडे निघाले. तुकाराम याने त्याची दुचाकी इस्लामपुरातील एका मंगल कार्यालयाजवळ लावली. व दोघे जण रसिका हिची दुचाकी क्र. एम. एच. ११ सी. यु. ६५१४ वरून पुढे निघून गेले. दरम्यान

तुकाराम व रसिका यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी संशयीत तुकाराम याने तीचा गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून नेत ताकारी येथे कृष्णानदीपात्रात मृतदेह फेकून दिला. त्यानंतर रसिका हिची दुचाकीही पाण्यात टाकून दिली. त्यानंतर तुकाराम हा बुधवारी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने रसिका हिच्या खुनाची माहिती पोलिसांना दिली.

इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पथक व सांगली येथील आयुष पथकाने रसिका हिच्या शोधासाठी मोहिम राबवली. बुधवारी रात्री रसिका हिची दुचाकी शोधण्यात पथकाला यश आले. गुरूवारी दिवसभर रसिका हिच्या शोधासाठी शोध मोहिम राबवली होती. शुक्रवारी दुपारी साटपेवाडी बंधा-या नजीक प्लॅस्टिकच्या गोणीत तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस अधिक्षक संदीप घुगे, पोलिस उपाधिक्षक अरूण पाटील यांनी भेट देवून सुचना केल्या. येथील उपजिल्हा रूग्णालयात रसिका हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रसिका हिचा मुलगा ओंकार कदम याने ईश्वपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ करत आहेत.

Post a Comment

0 Comments