Type Here to Get Search Results !

डोंगराळे घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे कडकडीत बंद पाळून.

 



शालेय विद्यार्थ्यांनी काढला पोलीस स्टेशन वर मोर्चा....

प्रतिनिधी  :- गणेश ठाकरे लासलगाव

 संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडली एका नराधमाने चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला. या नराधामा ला लवकरात लवकर फाशी दयावी , सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालावा या मागणीसाठी राज्यभरात निषेध मोर्चे आंदोलन सुरू आहेत 

या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लासलगाव येथे लासलगाव ग्रामस्थ समस्त सोनार समाज यांच्या वतीने कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणावर होता  याप्रसंगी लासलगाव पोलिसांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले 

Post a Comment

0 Comments