निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा समन्वय समितीने दिले निवेदन
ईश्वरपूर / प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने टीईटी परीक्षा सक्ती संदर्भाचा निकाल दिलेला आहे. त्या विरोधात राज्य शासनाने पुनर्विचार दाखल करावी या प्रमुख मागणीसोबत १५ मार्च २०२४ चा संचमान्यता आदेश रद्द करावा, वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवाकालावधीसाठी ग्राह्य धरण्यात यावी, सर्व ऑनलाईन कामे रद्द करण्यात यावीत, शिक्षण सेवक योजना रद्द करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी या विविध मागण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना सांगली जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.याप्रसंगी शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे, सरचिटणीस सदाशिव वारे, कार्याध्यक्ष डॉ.संतोष कदम, , प्रसिद्धीप्रमुख चंद्रशेखर क्षीरसागर,उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख मुकुंद सूर्यवंशी, सिताराम भौरले, बाबा लाड, विष्णुपंत रोकडे, टी. के. जावीर, संजय साबळे, उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख मनोहर साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments