ईश्वरपूर / प्रतिनिधी
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा पॉवरलिप्टर मनिष विजय यादव (बनेवाडी) याने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिप्टिंग स्पर्धेत ज्युनिअर गटात १२० किलो गटात बेंचप्रेस,पॉवर लिप्टिंग आणि डेडलिप्टिंग विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याची हरिद्वार येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिप्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक दादा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे.
मनिष यादव हा राजारामबापू पाटील इनडोअर स्टेडियममधील अद्यावत व्यायाम शाळेत सराव करतो. त्यास प्रशिक्षक हर्षद बारे यांचे प्रशिक्षण मिळत आहे. त्याने गेल्या वर्षभरात देश-विदेशातील अनेक स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. तो सध्या ईश्वरपूर येथील विद्यामंदीर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता १२ वीमध्ये शिकत आहे.

Post a Comment
0 Comments