Type Here to Get Search Results !

राज्य परिवहन महामंडळ प्रवाशी बस ट्रकचा भीषण अपघात.



अतुल कोवे = मारेगाव 

मारेगाव : वणी-यवतमाल महामार्गावर जालका फाट्यावरून सुमारे 200 मीटर अंतरावर झालेल्या भीषण अपघातात बसमधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

वणी डेपोची राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक MH 40 Y 5782 ही प्रवासी भरलेली बस,चंद्रपूर वरून यवतमाळ कडे जात असताना भरधाव ट्रकने एसटी बसला समोरून धडक दिली.हा दुर्दैवी अपघात आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबरला सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला.या भीषण अपघातात बसमधील दोन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटना थळी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.गंभीर जखमी प्रवाशांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात किती प्रवाशांचा मृत्यू झाला किंवा किती जण जखमी झाले याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. तथापि, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन प्रवाशांचे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातात बस चिरडून अक्षरशः बसचे दोन तुकडे झाल्याचे चित्र आहे.


Post a Comment

0 Comments