झारगडवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रथमता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मार्तंड देवस्थान जेजुरी ट्रस्टचे विश्वस्त श्री. अभिजीत (काका) देवकाते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मार्तंड देवस्थान जेजुरी ट्रस्टचे विश्वस्त श्री. अभिजीत (काका) देवकाते पाटील यांच्या वतीने झारगडवाडी परिसरातील गावठाण, जाधववस्ती,निकम वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संगणक संच तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झारगडवाडी येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण साधनांची गरज ओळखून हा उपक्रम राबविण्यात आला. मा.मुख्यकार्यकारी मा.माणिकराव बिचकुले यांनी सांगितले की शाळांना संगणक संच उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची अधिक संधी मिळणार असून अभ्यासात गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
मा.अभिकाका देवकाते पाटील विश्वस्त मार्तंड देवस्थान ट्रस्ट जेजुरी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात दिलेल्या या योगदानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
सदरच्या कार्यक्रमाच्यावेळी अभिकाका देवकाते मार्तड देवस्थान विश्वस्त ,माजी मुख्यकार्यकारी अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलिस पाटील -शोभाताई बोरकर,संचालक भवानीनगर कारखाना-संतोष मासाळ, सरपंच - अजित बोरकर, ग्रामपंचायत सदस्य- अजित बुरुंगले, हनुमंत झारगड,अक्षय आवटे, राहुल चव्हाण,तंटामुक्ती अध्यक्ष - गोरख बोरकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष-रणजित बोरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निकमवस्ती - संदिप झारगड, प्रविण बोरकर,सतिश कुलाळ माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलाळ, तानाजी कुंभार, मच्छिंद्र करे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झारगडवाडीच्या मुख्याध्यापिका गुरव मॅडम,लाटे सर,नाळे मॅडम, भोसले मॅडम तसेच निकम वस्ती शाळेचे शिक्षक होळकर सर, फुले मॅडम तसेच जाधव वस्ती शाळेच्या सिताब मॅडम,टेंबरे मॅडम तसेच अंगणवाडीच्या चौधरी,मासाळ,बनकर मॅडम तसेच आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments