प्रतिनिधी गणेश ठाकरे लासलगाव
संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे याअंतर्गत ग्रामपंचायत वेळापूर येथे ग्रामीण रुग्णालय लासलगाव चे वतीने *राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण शिबिर कार्यक्रम* दिनांक 22/12 /2025, सोमवार रोजी मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे सर,तसेच मा.वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाळकृष्ण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आ.केंद्र निमगाव वाकडा अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत वेळापूर येथे शिबिर आयोजित करण्यात आले.
सदर शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, आवश्यकतेनुसार ECG तपासणी, मुख व स्तनाचा कर्करोग, याची तपासणी करण्यात आली. यावेळी 133 रुग्णांनी तपासणी करून घेतली. सदर शिबिरा मधे रुग्णालयातील NCD विभागाचे वर्षा भालेराव मॅडम समुपदेशक विकास आडे व NCD समुपदेशक प्रशांत ठाकरे ग्रामपंचायत मा.सरपंच नारायण पालवे कर्मचारी गणेश ठाकरे, DK शिंदे, नारायण शिंदे, सूरज शिंदे, गणेश शिंदे,आशाताई मंगल वाघ, अंगणवाडी कार्यकर्ती सोमेश्वर शिंदे, मदतनीस भाग्यश्री पालवे, मुख्याध्यापक प्रताप आढाव, संगीता लहाने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments