प्रतिनिधी: शिव शंकर तुपकर सोनपेठ
श्री माधवाश्रम विद्या मंदिर, कढाका येथील इयत्ता दहावी २००० सालच्या विद्यार्थ्यांचा २५ वर्षांचा रौप्य महोत्सवी स्नेहमेळावा रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात अत्यंत आनंदी आणि भावनिक वातावरणात पार पडला.२५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. बालपणीच्या आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन, वर्गातील गमती-जमती आणि शालेय जीवनातील अनुभव यांची उजळणी करत अनेक क्षण भावूक झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागे शिक्षकांचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे मनोगतातून व्यक्त केले.सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, अनुभव कथन, छायाचित्र प्रदर्शन यामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते. जुन्या वर्गमित्रांशी भेट, गप्पा, हास्य आणि आठवणींनी हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अर्जुन जाधव, उमाकांत पांचाळ व शिवशंकर तुपकर औदुंबर यादव राधाकिसन गवळी तसेच सर्व सहकाऱ्यांनी केले. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचा निर्धार करत स्नेहमेळाव्याची सांगता झाली.
हा रौप्य महोत्सवी गेट-टुगेदर केवळ एक कार्यक्रम न राहता, आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी एक सुंदर आठवणीचा ठरला.

Post a Comment
0 Comments