Type Here to Get Search Results !

सिंधू बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे ‘मराठवाडा रत्न पुरस्कार २०२६ ’ गोपाळ कळसकर यांना जाहीर




 प्रतिनिधी -  गोपाळकुमार्  कळसकर  

भुसावळ (जळगांव) : सिंधू बहुद्देशीय सेवाभावी संस्था अंधारवाडी (हिंगोली) यांच्या तर्फे दरवर्षी समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक, युवा उद्योजक, क्रीडा, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणीजणांना मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. ‘पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ या तत्वावर सिंधू बहुद्देशीय सेवाभावी संस्था कार्य करीत आहे. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या हेतूने संस्था कार्यरत आहे. यंदाचा हा पुरस्कार सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता मां जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी यांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील नि:स्वार्थ व उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन गोपाळकुमार चांगदेव कळसकर (आयुध निर्माणी वरणगांव) यांची यंदाच्या मराठवाडा रत्न पुरस्काराकरीता सिंधू बहुद्देशीय सेवाभावी संस्था अंधारवाडी(हिंगोली) यांच्यातर्फे निवड करण्यात आली आहे. गोपाळकुमार कळसकर हे दैनिक बाळकडू, अधिकारनामा, सारथी महाराष्ट्राचा न्यूज, तेजोमय न्यूज प्रतिनिधी असून दैनिक योजना दर्पण, बाळकडू, सारथी महाराष्ट्राचा अशा वृत्तपत्रांतून त्यांनी जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली असून ते झेप फाउंडेशन, पुणे या संस्थेचे जळगांव जिल्हा सचिव आहेत. 

येत्या ४ जानेवारी २०२५ रोजी इन्स्पायर इन्स्टिट्यूट, विवेकानंद नगर, हिंगोली येथे सदर पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास विठ्ठल भुसारे (शिक्षणाधिकारी, जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ परभणी), राहुल गुप्ता ( जिल्हाधिकारी,हिंगोली), विवेक गायकवाड (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.हिंगोली), महेश खडतकर (मुद्रांक जिल्हाधिकारी, नांदेड), राजेंद्र कदम (जिल्हा कृषी अधिकारी,हिंगोली), राजेश मरावर (जिल्हा क्रीडा अधिकारी,हिंगोली), डॉ.आर एस माने (स्वा.रा.ति.म.विद्यापीठ,नांदेड),प्रा.डॉ.संतोष देवसरकर (स्वा.रा.ति.म.विद्यापीठ, नांदेड), योगेश सांगळे (अभियंता भारतीय अंतराळ संस्था,इस्त्रो ), श्रावण व्यवहारे (सहा.आयुक्त मत्स्य व्यवसाय हिंगोली) आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानपत्र, मानाचा फेटा व ट्रोफी देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.  या सन्मानाबद्दल गोपाळ कळसकर यांच्यावर  अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर कार्यक्रमात बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सिंधू बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे संयोजक प्रा.गोपाळ भोस व महारुद्र गायकवाड (अध्यक्ष, कयाधू अमृततुल्य प्रा.लि.कंपनी) यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments