Type Here to Get Search Results !

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 26 चे अनुषंगाने परिमंडळ 4 मधून 138 आरोपी तडीपार

 



 प्रतिनिधी 

पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक चार नागपूर शहरांतर्गत माननीय पोलीस माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन (भा पो से ) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आगामी नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 26 निवडणुकीच्या होणाऱ्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याच्या उद्देशाने रेकॉर्डवरील 138 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. खून खुनाचा प्रयत्न दरोडा खंडणी दहशत वाजवणे दुखापत करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यातील हे आरोपी आहेत. त्यांना निवडणूक संपेपर्यंत परिमंडळ क्रमांक चार च्या हद्दीतून तडीपार करण्यात आले. सदरचे आदेश माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव भापोसे परिमंडळ क्रमांक चार यांनी दिले तसेच त्यांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी त्यांचे मतदान केंद्रावर हजर राहण्याची मुभा दिली. 

पोलीस ठाणेनिहाय तडीपारांची संख्या, अजनी पोलीस स्टेशन 35, हुडकेश्वर पोलीस स्टेशन 27 बेल तरोडी पोलीस स्टेशन 18,सक्करदरा पोलीस स्टेशन 20, नंदनवन पोलीस स्टेशन 23, इमामवाडा पोलीस स्टेशन 15 असे एकूण 138 आरोपींना तडीपार करण्यात आलेले आहे.

    सध्या शहरात महानगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून जानेवारी 16 जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू आहे या कालावधीमध्ये मतदारांवरती दबाव हिंसाचार पैशाचे वाटप धमकी किंवा वर्चस्व दाखविण्याचे प्रकार टाळण्याकरिता दर निवडणुकीदरम्यान अशी तडीपार व प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. याच अनुषंगने परिमंडल क्रमांक चार मधील पोलीस ठाण्याकडील गुन्हे अभिलेख गुन्हेगारी इतिहास आणि सध्याचे हालचाली तपासून ही कारवाई करण्यात आलेली आहे. परिमंडळच्या अंतर्गत  पोलीस ठाणे  सक्करदरा,नंदनवन, इमाम वाडा, बेल तरोडी, अजनी, हुडकेश्वर या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. सदर तडीपार कारवाईमुळे गुन्हेगारांना निवडणूक काळात संबंधित कार्यक्षेत्रात प्रवेश वास्तव्य तसेच सार्वजनिक कार्यक्रम सभा मिरवणूक व खुले वावरण्यात सप्त मनाई करण्यात आलेली आहे. तडीपार आदेशाचा भंग करून संबंधित गुन्हेगारांनी परिमंडळ क्रमांक ४ च्या हद्दीत प्रवेश केल्यास किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणारी कोणतीही कृती केल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments