Type Here to Get Search Results !

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात साजरा

 



प्रतिनिधी = गणेश ठाकरे, लासलगाव 

निफाड तालुका प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा २) अंतर्गत निफाड तालुक्यातील एकूण ६८५० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली असून सर्व घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यापैकी २१०८ घरकुलांचे बांधकाम  पूर्ण झाले आहे.

या पूर्ण झालेल्या घरकुलांचा तालुकास्तरीय गृहप्रवेश कार्यक्रम कोठुरे (ता. निफाड) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात आज सोमवार दि. २६ जाने. २०२६ रोजी सकाळी १० वा हा गृहप्रवेश कार्यक्रम आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते  घरकुल लाभार्थी यांच्या सोबत फित कापून गृहप्रवेश कार्यक्रम लाभार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 या कार्यक्रम प्रसंगी श्रीमती नम्रता जगताप गटविकास अधिकारी सुनिल पाटील सहा. गटविकास अधिकारी, संजय पवार प्रशांत बोरसे,राजेश थोरात विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आरती दिघे, व सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शासनाच्या घरकुल योजनेमुळे वंचित व गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहे.  श्रीमती नम्रता जगताप गटविकास अधिकारी 


Post a Comment

0 Comments