Type Here to Get Search Results !

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या राज्य निवडणुका लोकशाही पद्धतीने संपन्न “माझा सभासद हाच राजा” या तत्त्वावर नव्या राज्य नेतृत्वाची सुरुवात



प्रतिनिधी = गणेश ठाकरे, लासलगाव

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सुरवाडी येथे महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या सन २०२६–३१ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक राज्य निवडणुका दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी संघटनेच्या घटनेतील तरतुदीनुसार पूर्णतः लोकशाही व शांततेच्या वातावरणात पार पडल्या.

या निवडणुकीत नितीन धामणे यांची राज्य अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक, शांत व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नारायण पवार यांची राज्य मानद अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच हरिश्चंद्र काळे (राज्य सचिव), महेंद्र निकम (राज्य कोषाध्यक्ष), मधुकर मुंगल (कार्याध्यक्ष), योगेश पगार बापू (राज्य उपाध्यक्ष) यांची निवड जाहीर झाली. यावेळी राज्य महिला उपाध्यक्षपदी स्नेहल नरळे पाटील (सातारा) व आरती पाटील (नंदुरबार) यांची निवड करण्यात आली. यासोबतच बाजीराव डांगे (सह कोषाध्यक्ष), अनिल न्यादे (राज्य संघटक) व हेमंत पवार (राज्य प्रसिद्धी प्रमुख) यांचीही नियुक्ती करण्यात आली.

या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतनाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने देवव्रत (संजय) बाविस्कर, नाशिक जिल्हा मार्गदर्शक यांनी संघटना व राज्य कार्यकारिणी यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले योगेश पगार यांची ३० वर्षांची प्रामाणिक सेवा व सभासदहितासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले.

वर्गणीविरहित संघटनात्मक कार्य, सभासदहिताला प्राधान्य आणि “माझा सभासद हाच राजा” हे तत्त्व संघटनेची ओळख ठरत आहे. “भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नहीं” हा संदेश अधोरेखित करत नवीन राज्य कार्यकारिणी तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हक्क, न्याय व सन्मानासाठी जबाबदारीने कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

निवडणूक प्रक्रियेनिमित्त आयोजित कार्यक्रमास नाशिक तालुका अध्यक्ष श्रावण वाघचौरे, दिंडोरी तालुका अध्यक्ष काटे बापू, जिल्हा सहाय्यक सचिव विजय पवार, निफाड तालुका अध्यक्ष नानासाहेब तांबे, सिन्नर तालुका अध्यक्ष दत्तात्रय बन, इगतपुरी तालुका अध्यक्ष संदीप नेटके, जिल्हा सचिव माया मोढे व जिल्हा कोषाध्यक्ष विनोद अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments