Type Here to Get Search Results !

गोपीचंद पडळकरांच्या मतदारसंघात रस्त्यांचे हाल बेहाल



प्रतिनिधी - युवराज माने 

सांगली जत : जत तालुक्यातील शेगाव गावात रस्ते पूर्णपणे खड्यात गेले आहेत स्थानिकांचे मात्र पूर्णपणे याकडे दुर्लक्ष होत आहे गावातील अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन सुद्धा अजूनही यावर मार्ग निघत नाही त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विषेशतः शेगाव ग्रामपंचायत या दुर्लक्ष करत आहे वारंवार मागणी करुन सुद्धा आमदार पडळकरांचा ही शेगाव गावाकडे पाठ फिरवली आहे पावसाळ्यात पूर्णपणे नागरिकांचे हाल होतात त्यामुळे लोकांची भावना आहे की गोपीचंद पडळकरांनी लवकरात लवकर लक्ष घालून या प्रश्नावर तोडगा काढावा समाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते पूर्णपणे या रस्त्यांच्या प्रश्नावर काम करत आहेत पण  शेगाव ग्रामपंचायत मात्र साथ देत नाहीत पूर्णपणे शेगाव गावच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे शेगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे तालुक्यात ही भाजप आहे तरीही शेगाव गावच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे

Post a Comment

0 Comments