दि. 20 जानेवारी 2026 रोज मंगळ वारला सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र राजुरा वतीने वपअ यांचे मार्गदर्शनात EEP अंतर्गत बालाजी हायस्कूल,जिवती, येथे "पर्यावरण जनजागृती" या संकल्पनेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्लास्टीक वापर कमी करणे, कापडी कागदी पिशव्या तयार करणे याबाबत मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. एन. भगत सर यांनी केले आणि शाळेचे शिक्षकवृंद आणि वनपाल श्री.व्ही.एच.चव्हाण साहेब उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना अपास पर्यावरण संस्था राजुरा यांनी प्लास्टीकमुळे पर्यावरणवर होणारे दुष्परिणाम, त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन प्रास्ताविक कू. बेंबडे मॅडम, प्रमुख पाहुणे श्री गजानन गायकवाड अंबुजा फाउंडेशन एन.जी. ओ. यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, हरित सेना प्रमुख श्री वेट्टी सर,श्री. शेंडे सर,वाघमारे मॅडम, यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
"कापडी कागदी पिशव्या वापरा, प्लास्टीक कचरा टाळा" असा अर्थबोध येणारे चित्र काढून रंगविणे अशाप्रकारची स्पर्धा घेण्यात आले.व सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. आडे सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्री पवार सर यांनी केले आभार प्रदर्शन करून अल्पोपहार कार्यक्रम आटोपला.

Post a Comment
0 Comments