Type Here to Get Search Results !

पंचायत समिती जिल्हा परिषद लवकरच धुरळा उडणार



प्रतिनिधी - युवराज माने 

सांगली जत - जत तालुक्यातील शेगाव गावाच्या गटातून काल बुधवारी शेवटच्या क्षणी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले शेगाव गावात पंचायत समितीसाठी तिहेरी लढत रंगणार आहे शिंदे सेना विरुद्ध भाजप विरुद्ध काॅंग्रेस असा थेट सामना रंगणार आहे भाजप मधून उमेदवार सध्या शेगाव गावचे उपसरपंच सचिन बोराडे उमेदवार आहेत तर काॅंग्रेस मधून उद्योजक साहेबराव शिंदे आणि शिंदेच्या शिवसेनेतून सर्वसामान्य पिगमी ऐजेंट चंद्रकांत शिंदे हे पंचायत समिती लढवणार आहेत आताच्या घडीला म्हंटले तर शिंदे शिवसेनेचं पारडं जास्त मजबूत दिसत आहे कारण लोकांना बद्दल हवा आहे भाजप काॅंग्रेसच त्रासाला कंटाळून जनतेते शिवसेनेच्या चंद्रकांत शिंदेंची चर्चा चांगलीच रंगली आहे शेगाव पंचायत समिती गटात एकूण सात गावांचा समावेश आहे त्यामुळे तीन पक्षांसोबत हेच आव्हान आहे की या सात गावातील मतं आपल्याकडे खेचून आणणे त्यामुळे शेगाव पंचायत समिती गटाची निवडणूक रंजक ठरणार आहे . 

          तर शेगाव जिल्हापरिषद निवडणूकीचा विचार केला तर शेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपकडून डाॅ. शिवाजी खिलारे हे उमेदवार आहेत तर काॅंग्रेस कडून उद्योजक परशुराम सांगोलकर हे उभे आहेत जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवार दिला नसल्यामुळे थेट भाजप विरुद्ध काॅंग्रेस सामना असणार आहे दोन्ही बाजूंनी ताकदवर उमेदवार आहेत एकीकडे शेतकऱ्यांना पेरू बागांसाठी मार्गदर्शन करणारे शिवाजी खिलारे आहेत दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी रासायनिक खत पुरवणारे उद्योजक परशुराम सांगोलकर मैदानात आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पहावं लागणार आहे. 

  

Post a Comment

0 Comments