Type Here to Get Search Results !

अमेरिकेतही श्री संत गजानन महाराज प्रगटदिन साजरा.



   गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :- 

   दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव हा अमेरिका येथील Orlando या ठिकाणी हिंदू सोसायटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडा मंदिरात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सागर सावजी व डॉक्टर नेहा सावजी यांनी अभिषेक व पूजा करून केली. त्यानंतर सामूहिक पारायण ,भजन, आरतीचा कार्यक्रम झाला. अमेरिकेसारख्या ठिकाणी शेकडो जणांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन मूळ डोणगाव निवासी माजी राज्यमंत्री श्री सुबोध भाऊ सावजी यांचे बंधू श्री प्रशांत व सौ मीनल सावजी, यांनी केले याप्रसंगी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद बनविण्यासाठी प्रामुख्याने नूतन ओक, सुयशा गुळगुळे, सुरभी महाजन, कल्पना कीर्तने, नयना कावळे यांनी मदत केली. महाराजांच्या कृपेने याही वर्षी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला. अशीच महाराजांची कृपा आपणा सर्वांवर नेहेमी राहो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. अशी सर्वांच्या वतीने गजानन महाराजांना प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता झाली

डोणगाव येथे येणारी श्री संत गजानन महाराजांची पालखी तदनंतर श्री सुबोध भाऊ सावजी हे राज्यमंत्री असताना त्यांच्या शासकीय निवासस्थान ब पाच यामध्ये हत्ती घोडा पालखीसह झालेले श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन आणि 36 वर्षांपूर्वी अमेरिकेत वास्तव्यास गेलेल्या प्रशांत सावजी यांनी तेथेही अविरतपणे सुरू ठेवलेला श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन हा गजानन महाराजांवर असलेल्या त्यांच्याशी भक्तीचा विषय चर्चेचा व भारतीय संस्कारातही आहे


Post a Comment

0 Comments