गजानन वाघमारे डोणगाव प्रतिनिधी :-
डोणगांव :-
स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन चाटात संपन्न झाले असून स्नेहसंमेलन यांच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना चालना व वाव मिळतो असे मत माजी सभापती राजेंद्र पळसकर यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केले 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेंद्र पाटील पळसकर तर उदघाटक म्हणून जिल्हा काँग्रेसचे
उपाध्यक्ष शैलेश सावजी तर अतिथी म्हणून सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व अध्यक्ष तसेच पालक हजर होते या वेळी प्रथम दिपप्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून शिक्षकवृंदानी स्वागत केले. प्रास्ताविक मनोगतातून मुख्याध्यापिका सौ वर्षा लांभाडे यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर करुन विद्याथ्यांसाठी राबवित असलेल्या विविध शालेय उपक्रमाची विस्तृत माहिती दिली.
यावेळी विद्यार्थीनी देशभक्तीपर, धार्मिक व जनप्रबोधनात्मक गिते सादर करुन उपस्थीतांचे मनोरंजन केले. याप्रसंगी मान्यवंरानी आपल्या मनोगतातून या शाळेचे आम्ही माजी विद्यार्थी असल्याने या शाळेचे आमच्यावर खुप उपकार असुन विद्यामान शिक्षकांनी ते उपकार फेडण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन राहुल डोंगरदिवे तर आभार बाला प्रसाद आखाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सौ वर्षाताई लांभाडे शिक्षिका सुनीता भुसारी, संगीता काळे, मालती अंभोरे, छाया बोरुडे, लता जामकर, वैशाली चव्हाण सह सहा शिक्षक राहुल डोगरदिवे, पवन गायकवाड आदिनी अथक परिश्रम घेतले.
( सांस्कृतिक कार्यक्रमात कार्यक्रम झाला याच विशेष म्हणजे सरपंचाला डावळून ऐनवेळी उद्घाटनाचा कार्यक्रम उरकून घेण्यात आला ज्यामध्ये गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंचाला सुद्धा याची माहिती देण्यात आली नाही ज्याला पाहता कार्यक्रमात कार्यक्रम झाल्याची चर्चा रंगली.)

Post a Comment
0 Comments