Type Here to Get Search Results !

उपनगराध्यक्षांसह कुटुंबाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण



प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी 

मध्यरात्री घडलेल्या थराराने महागाव शहरात खळबळ*

> यवतमाळ मार्मिक महागाव :शिवसेना उपजिल्हा प्रमुख, महागाव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींचे राहत्या घरातून अपहरण झाल्याची धक्कादायक घटना ५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री महली आहे. अज्ञात आरोपींनी देशी कट्ट्याचा धाक दाखवून भरवाडे कुटुंबीयांना त्यांच्याच कारमधून पळवून नेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख तथा महागाव नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांचे भाऊ सचिन भरवाडे यांनी याप्रकरणी महागावपोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गुरुरात्री संपूर्ण कुटुंब जेवण करून झोपले होते. मध्यरात्री २:३० च्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी घराचा दरवाजा ठोठावला. सचिन भरवाडे यांनी दरवाजा उघडला असता, आरोपीनी "पोलीस स्टेशनचे काम आहे" असे सांगून घरात प्रवेश केला. सचिन यांनी त्यांचा मोठा भाऊ प्रमोद यांना उठवताच आरोपींनी आपले हिंसक रूप धारण केले. एका आरोपीने प्रमोद भरवाडे यांना धक्काबुक्की केली, तर दुसऱ्याने त्यांची मोठी मुलगी वैष्णवी हिच्यावर देशी कट्टा रोखून "हालचाल केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दहशतीने वातावरण निर्माण करून आरोपींनी प्रमोद भरवाडे, त्यांची पत्नी प्रियंका आणि दोन मुलाना घरासमोर उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये (क्रमांक एम.एच ४६एन६८३९) जबरदस्तीने बसवले, विशेष म्हणजे, आरोपींनी प्रमोद भरवाडे यांनाच गाडी चालवण्यास भाग पाडले. "पोलीस स्टेशनला कळवले तर जीवाने मारू, आमचे काम झाले की चार दिवसांनी त्यांना सोडून देऊ" अशी धमकी देऊन आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेमुळे महागाव शहरात भीतीचे सावट पसरले असून, पोलीस आता आरोपीचा आणि अपहृत कुटुंबाचा कसून शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच ताणेदार धनराज निळे उपोनि अमोल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि धौरज बांडे, उपपोनि शरद लोहकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सर्व सीसीटीव्हीची पाहणी करून तपास कामी पथक रवाना केली आहेत.

उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन अपहृत कुटुंबाची लवकरात लवकर सुखरूप सुटका करण्याच्या सुचना दिल्या आहेत. एकाच वेळी संपूर्ण परिवाराचे बंदुकीच्या भाकावर अपहरण केल्या गेल्याने महागाव शहरासह तालुक्यात भीतीचे बाताबरण निर्माण झाले असून अपहरण कर्त्यांचा शोध घेवुन भरवाडे परिवाराची सुखरूप सुटका करण्याचे तगडे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

या घटनेचा पुढील तपास महागाच पोलिस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक अमोल राठोड करीत आहेत.चारचाकी आढळली मानवाडी फाट्यावर.ज्या स्विफ्ट डिझायर गाडीतून उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे व त्यांच्या परिवाराचे अपहरण करण्यात आले ती गाडी नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मानवाडी फाट्यावर आढळुन आली असुन महागाव पोलिसांनी ती गाडी त्याठिकाणावरून जप्त करून महागाव पोलिस स्टेशन मध्ये जमा केली आहे.

6 आरोपीचा शोध पोलीस पथकाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत असून सिसि टीव्ही फुटेज तपासल्या पासून त्या दिशेने तपास सुरू आहे लवकरच अपहरण करणाऱ्या आरोपीचा शोध लावून भरवाडे कुटुंबाची सुखरूप सुटका करण्यात येईल ठाणेदार: धनराज निळे

महागाव नगरपंचायत चे उपाध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे हे वाशिम येथे असल्याचे समजते त्यांनी महागाव शहरातील काही पत्रकार व कार्यकर्त्यांना संपर्क करून घेण्यासाठी यावे असे सांगितले आमच्या प्रतिनिधीने त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता बंद असल्याचे आढळून आले

Post a Comment

0 Comments