श्रीक्षेत्र माहूर : - माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील श्री शंकरराव चव्हाण विद्यालयात दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यालयातील 12वी कला व विज्ञान च्या विध्यार्थ्यांना निरोप म्हणून निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. इ. 11 वी कला व विज्ञान चे सर्व विध्यार्थी विध्यार्थिनी व शिक्षक वृंद यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून तुकारामजी केशवे शिक्षण संस्था आष्टा चे अध्यक्ष मा. बाबारावजी केशवे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून शंकरराव चव्हाण विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रजी केशवे, सिंदखेड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पो.णी.मा. रमेश जाधवर साहेब, जगदंबा हायस्कुल चे प्राचार्य मा.विश्वासराव जाधव सर, निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर चे युवा आघाडी तालुकाध्यक्ष पत्रकार आदेश बेहेरे व आष्टा येथील उपसरपंच जितेश जाधव शाळेचे पर्यव्यक्षक अशोक सोळंके सर व कोथळकर सर आदी मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम महापुरुषयांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कु. स्नेहल राठोड, जान्हवी राठोड व चांदणी राठोड या विध्यार्थिनींणी स्वागत गीत गात उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आणी प्रजासत्ताक दिणानिमित्त घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम आलेल्या विध्यार्थ्यांचा व त्यांच्या चमू चे प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आले. व कु. कोमल मुंडकर, श्रुती पूलते, सलोनी राठोड, साक्षी दिवटेवाड, सिम्पल राठोड, वेदिका गवळी व कु. दुर्गेश या सर्व 12वी च्या विध्यार्थी आणी विध्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मा. बाबारावजी केशवे यांनी अध्यक्षीय भाषण करून विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तर प्राचार्य राजेंद्र केशवे सर यांनी आपल्या व्यक्तव्यातून बारावी नंतर काय करायचे काय नाही आणी आज पर्यंत चा शाळेतील त्यांचा प्रवास याबद्दल माहिती देत शिक्षण क्षेत्रात कुठलीही अडचण आली तरी सांगा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत शाळा सोडली म्हणजे नाते सुटत नाहीत असे विध्यार्थ्यांना आश्वासन दिले. तसेच पोलीस निरीक्षक जाधवर साहेब यांनी कायदेविषयक माहिती देत दहावी व बारावी च्या अंतिम परीक्षेच्या काळात कुठलीही नक्कल चालू देणार नाही जर कोणत्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक नक्कल देताना आढळ्यास त्याच्यावर कायदेशील कार्यवाही करू असी ताकीत देखील दिली. जगदंबा हायस्कुल चे प्राध्यापक मा. जाधव सर यांनी आपल्या भाषणातून विध्यार्थ्यांना बऱ्याच शैक्षिक बाबींचे मार्गदर्शन केले तर प्रा. तुषार टास्के सरांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापिका श्रीमती कोषटवार मॅडम, प्रा. प्रशांत कदम सर असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलास भंडारे सर यांनी केले तर मा. कोथळकर सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments