*प्रविण कुंटे उमरखेड प्रतिनिधी
उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मच्छीमार हे दैनंदिन मच्छी विक्रीसाठी करोडी रोड, उमरखेड येथील मच्छी मार्केट वर पूर्णता अवलंबून असुन, सदरील मार्केटमध्ये भोई समाज बांधव आपली मच्छी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु सध्याच्या मच्छी मार्केटमध्ये अपुऱ्या असलेल्या जागेमुळे त्यांना मच्छी विकणे सुद्धा शक्य होत नाही. अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटलेली असून उमरखेड तालुक्यातील भोई समाज बांधव बेरोजगारीच्या व कर्जबाजारीच्या विळख्यात सापडलेले आहेत.
रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे दीड वर्षापासून संबंधित विषयीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, या संदर्भात उमरखेडचे तहसीलदार यांनी आदेश काढून सुद्धा त्याची अमलबजावणी होत नसून, तसेच नगरपरिषद उमरखेड यांच्याकडून रिपब्लिकन युवा सेनेला देण्यात आलेले लेखी स्वरूपाचे आश्वासन देखील पाळण्यात आले नसल्याकारणाने रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात उमरखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना संबंधित विषयाचे गांभीर्य निदर्शनास आणून देत मच्छी मार्केट मधील जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेत येत्या आठ दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील प्रशासनास देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. उपाध्यक्ष राजू आगीरे, गजानन भोयर, भावराव भोयर, सकाराम राकडे, काशिनाथ आगिरे, देवराव राकडे, विजय राकडे, उमेश राकडे, नारायण राकडे, श्रीराम आगिरे, संजय कामरे, सुरेखाबाई कामरे, मुनेश्वर राकडे, रामदास राकडे, लक्ष्मण राकडे, माधव राकडे, देविदास राकडे, अंबादास राकडे, गणेश आगीरे, अंकुश आगीरे, मुकुंदा राकडे, रामदास आगिरे, गजानन राकडे, शामराव आगिरे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments